जिल्हा परिषदांमधली गट क – गट ड संवर्गातली रिक्त पदं भरण्यास राज्य शासनाची मंजुरी

मुंबई : जिल्हा परिषदांमधली गट क तसंच गट ड संवर्गातली रिक्त पदं भरण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. 

सरळसेवा कोट्यातल्या एकूण रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत ही पदभरती करता येणार आहे. येत्या एक ते सात फेब्रुवारी दरम्यान याबाबतची जाहीरात प्रसिद्ध होईल.

14 ते 30 एप्रिल 2023 ला परीक्षा होईल तर मे 2023 अखेर उमेदवारांना नियुक्तीपत्रं देण्यात येतील, असं या निर्णयात म्हटलं आहे.