जाहिरातींची फलकं, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लावण्यासाठी जागा निश्चित करा : राज्य सरकार 

सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदांना दिले निर्देश

मुंबई : राज्यात जाहिरातींची फलकं, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लावण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारनं सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांना दिले आहेत. 

अशा जाहीराती लावणाऱ्यांना त्यावर आपली संपूर्ण माहिती क्यूआर कोडमधून देणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. 

राज्यभरातल्या बेकायदा फलकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवरच्या सुनावणीत न्यायालयानं, त्यावर नियंत्रण आणण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.