माजी मंत्री जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा : ‘ती’ पोस्ट चर्चेत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, माजी गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

आव्हाड यांच्याविरोधात काल मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. गेल्या 24 तासात आपल्याविरुद्ध ठाणे पोलिसांनी दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत, आपण पोलिसी अत्याचारा विरुद्ध लढणार असून, आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.  

दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत मुंब्रा भागात टायरची जाळपोळ केली, तर काही कार्यकर्त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर आज सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.