नांदेड : आगामी मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातलं शिंदे – फडणवीस सरकार कोसळेल, असं भाकित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते.
भारतीय जनता पक्ष भारत जोडो यात्रेबद्दल अपप्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात या यात्रेदरम्यान लोकं राहुल गांधी यांना भेटले.
त्यांनी सरकारच्या अन्यायकारक बाबी सांगितल्या, असं पटोले म्हणाले. राज्याला उध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.