बैतूल : मध्यप्रदेशात बैतूल जिल्ह्यातल्या झल्लाव इथं कार आणि बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 11 कामगारांचा मृत्यू झाला. वीस दिवसांपासून काही कामगार अमरावतीच्या काही भागात विविध कामं करण्यासाठी आले होते. ते मध्यप्रदेशात गावी परत जात असताना आज पहाटे हा अपघात झाला.
तवेरा चालकाला झोप आली असावी आणि यातून बसवर कार धडकली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात अधिक तपास मध्यप्रदेश पोलीस करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.