औरंगाबाद : राज्यात सर्व शहरांमधून आज सायंकाळी सुर्यास्तावेळी खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवता येणार आहे. दिवाळी निमित्त पृथ्वीवर दीपोस्तवाची रोषणाई सोबतच आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार असल्याची माहिती, एमजीएम विद्यापीठातल्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक, श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.
या सूर्यग्रहणाला साधारण सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या वेळी हे ग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. ग्रहण मध्य संध्याकाळी पाच वाजून 42 मिनिटांनी होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36 टक्के भाग झाकून टाकणार आहे.
पश्चिम आकाशात सुर्यास्तावेळी हे सुंदर दृश्य पाहता येणार आहे. नंतर ग्रहण सुटण्याआधीच संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ग्रहणातच सूर्यास्त होतांनाचं सूंदर दृष्य दिसणार असल्याचं औंधकर यांनी सांगितलं.