राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची गरज : आ. धनंजय मुंडे

अंबाजोगाई : राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक अनुदान तसंच पीकविमा या दोन्हीही प्रकारची मदत करण्याची गरज असल्याचं आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर परिसर, चोपणवाडी, पिंप्री, पट्टीवडगाव आदी भागात परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी आज आ. धनंजय मुंडे यांनी केली.

त्यानंतर मुंडे यांनी राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता तसंच कृषी विभागाचे सचिव एकनाथ डावले यांना शेतीच्या बांधावरून थेट फोन करून नुकसानाची माहिती दिली. 

शेतकऱ्यांशीही मुंडे यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला, राज्य सरकारकडे मदतीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं.