चनई ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ घनघाव खून प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल : 5 ऑक्टोबरला घडली होती घटना

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चनई गावात काल दिनांक 5 ऑक्टोबरला ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ घनघाव यांचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात 17 जणांवर ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

या प्रकरणी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत रामधन गोरखनाथ घनघाव (वय 25, रा. चनई) याने म्हणटलं आहे आहे की, दिनांक 5 ऑक्टोबरला सकाळी 10:30 वाजता वडील गोरखनाथ हे रमेश प्रल्हाद कदम यांच्या दुकानावर राशन आणण्यासाठी गेले असता रमेश प्रल्हाद कदम, धिरज रमेश कदम, सुरज रमेश कदम यांनी वडीलास, तू ग्रामपंचायत सदस्य आहेस, तूला कशाला राशन पाहिजे, असे म्हणून वडीलास जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना धक्के देत बाहेर रोडपर्यंत आणून त्यांना अपमानित केले. 

त्यानंतर सदर घटनेची कुरापत काढून पुन्हा सायंकाळी 5:30 च्या सुमारास मनोज नवनाथ ईटकर, नवनाथ मरगू ईटकर, धिरज रमेश कदम, सुरज रमेश कदम, रमेश प्रल्हाद कदम, प्रविण उत्तम मिसाळ, आकाश नवनाथ ईटकर, रोहित अविनाश शिनगारे, शैलेश लहु मोरे, राहुल अंकुश क्षीरसागर, सिध्देश्वर प्रकाश पांचाळ, शरद वैजेनाथ ढगे, शुभम बंडू उमाप, धर्मराज ज्ञानोबा चौरे, सुरज नारायण उमाप, गोविंद नारायण उमाप, दगडू आत्माराम मोरे सर्व रा. चनई, या लोकांनी वडिलांना जीवे मारण्याचा कट रचून सोनबा मरीबा दहरे यांच्या बंद टपरीच्या मागे, सिमेन्ट रोडवर वडील गोरखनाथ सिताराम घनघाव (वय 49) यांना खंजीरवजा चाकू, विटाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा खून केला व आजोबा मधूकर बाबू मोरे यांना पण कोयत्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

रामनाथ घनघाव याच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात 17 जणांवर ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलिस करीत आहेत.

आरोपींच्या अटकेसाठी ठाण्यात महिलांचा जमाव 

चनई खून प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी संतप्त महिलांचा जमाव शहर पोलिस ठाण्यात जमला होता. सर्व आरोपींना अटक करणारचं, असे ठोस आश्वासन देत अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी या महिलांची समजूत काढली.

5 दिवसांची पोलिस कोठडी

ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ घनघाव यांच्या खून प्रकरणी 6 जणांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.