‘नवकेशर नवरत्न पुरस्कार – 2022’ जाहीर : 1 व 2 ऑक्टोबरला मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, सरोजनी देशपांडे, डॉ. अरुना केंद्रे, विद्या रुद्राक्ष, गीता भोसले, ज्योती शिंदे, रुक्मिनी नागापुरे, रोहिणी लोमटे, ऋचा सरवदे पुरस्काराच्या मानकरी

अंबाजोगाई : नवकेशर सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘नवकेशर नवरत्न पुरस्कार – 2022’ ची घोषणा करण्यात आली असून यात नऊ महिलांचा समावेश आहे. दिनांक 1 व 2 ऑक्टोबरला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती नवकेशर सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा आरती भिमाशंकर शिंदे, सचिव भिमाशंकर शिंदे यांनी दिली आहे.

नवकेशर सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून सामाजिक, प्रशासकीय, सहकार, शैक्षणिक, आरोग्य यासह आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘नवकेशर नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. याही वर्षी संस्थेच्या वतीने महिलांना पुरस्कार देण्यात येणार असून त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर (प्रशासकीय), सरोजनी देशपांडे (सांस्कृतिक), डॉ. अरुना केंद्रे (आरोग्य), विद्या रुद्राक्ष (कृषी), गीता भोसले (फोटोग्राफी), ज्योती शिंदे (शैक्षणिक), श्रीमती रुक्मिनी नागापुरे (एकल महिला संघटन क्षेत्र), रोहिणी लोमटे (अंगणवाडी), ऋचा सरवदे (क्रिकेट) या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फेटा, अवॉर्ड बॅन्ड असे आहे. दिनांक 1 व 2 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता खंदारे मंगल कार्यालय, रिंगरोड या ठिकाणी दिमाखदार सोहळ्यात पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

‘नवकेशर नवरत्न पुरस्कार – 2022’ या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नवकेशर सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा आरती भिमाशंकर शिंदे, सचिव भिमाशंकर शिंदे, प्रा. अनंत कांबळे, कान्होपात्रा शिंदे, सुनिल व्यवहारे, गणेश तौर, सुशिल कुंबेफळकर, विक्रम आगळे, सत्यम जोगदंड, डि.के. राऊत, प्रविण जोगदंड यांच्यासह आदींनी केले आहे.