नवी दिल्ली : राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर आज सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत तसंच आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सुनावणी होईल. दरम्यान या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
शिंदे गटातल्या आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्या नोटीशींना आव्हान दिलं असून, शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड यासह काही मुद्यांवर शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकांचा यात समावेश आहे.
शिवसेना पक्ष कुणाचा, याबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी प्रलंबित असून, यासंदर्भातला निर्णयही आज होण्याची शक्यता आहे.