मुंबईत शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेच्या ठाकरे गटाला परवानगी

उच्च न्यायालयाने दिली परवानगी

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला मुंबईत शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने, मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचं निरीक्षणही नोंदवलं आहे. 

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती, ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. 

शिवसेनेकडून या निर्णयाचं राज्यभरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.