अंबाजोगाई : पोखरी मार्गावर मोठी वसाहत आली. परंतू अद्याप नाल्या बांधल्या नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक नागरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे तर केंब्रिज स्कूल समोरील घरात पाणी शिरले आहे.
शहराच्या दक्षिणेला पोखरी मार्गावरील केंब्रिज स्कुल समोर नाल्या नसल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरले. पावसाचं पाणी साचल्याने अनेक इमारतींना धोका निर्माण झाला आहे. सदरिल मार्गावर मुख्यमंत्री योजनेतून रस्ता मंजूर झाला आहे. परंतू, प्रत्यक्षात रस्ता अद्याप झाला नाही. या मार्गावर मोठमोठी खड्डे पडले असून वाहनचालकांची तारांबळ होत आहे.
शासन दरबारी अनेक वेळा निवेदने देऊन रस्ते व नाल्या बांधण्याची मागणी नागरिकांनी केली होती. परंतू, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जोगाईवाडी ग्रामपंचायतही दुर्लक्ष करित आहे. नाल्या बांधकामाच्या मागणीसाठी या भागातील नागरिक उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत.