दिमाखदार सोहळ्यात बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराचे वितरण 

योगेश्वरी शिक्षण संस्थेचे डॉ. सुरेश खुरसाळे, डॉ. डी. एच. थोरात, डॉ. पांडुरंग पवार, गौतमचंद सोळंकी, मौलाना मोहम्मद रमजान छोटू पटेल यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान

अंबाजोगाई : बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, डॉ. डी. एच. थोरात, डॉ. पांडुरंग पवार, गौतमचंद सोळंकी, मौलाना मोहम्मद रमजान छोटू पटेल यांचा शहरासाठी दिलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर अंबासाखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर, प्राचार्य. बी. आय. खडकभावी, प्रा. नानासाहेब गाठाळ, बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजकिशोर मोदी, प्रा. वसंत चव्हाण, संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व जनसमुदयास मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सुरुवातीस निवासी मूकबधिर विद्यालय, मतिमंद विद्यालय, निवासी अपंग विद्यालय स्थापन करण्यात आले. त्यानंतर खडकभावी सरांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू व्हिजन पब्लिक स्कुल, फार्मसी कॉलेज, बीसीए, बीएड व डीएड महाविद्यालय अशा सर्व संस्थांचे मोदी लर्निंग सेंटरची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे उद्घाटन स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते.

संस्थेच्या पहिल्या ‘सीबीएसई’ च्या बॅचमध्ये संस्थेचे संचालक संकेत मोदी यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण याच संस्थेत पूर्ण झाले आहे. 12 वी नंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या पेंसल व्हिनिया स्टेट विद्यापीठात प्रवेश घेऊन संकेत मोदींनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संकेत मोदी यांनी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन संस्थेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘जीवनगौरव’ पुरस्कार हा संकेत मोदी यांचीच संकल्पना असल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले. 

‘जीवनगौरव’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. सुरेश खुरसाळे, डॉ. डी. एच. थोरात, डॉ. पांडुरंग पवार, गौतमचंद सोळंकी, मौलाना मोहम्मद रमजान छोटू पटेल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात ‘NEET’ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व वैद्यकीय प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सन्मान देखील व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत कांबळे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार आनंद टाकळकर यांनी मानले. या पुरस्कार वितरण सोहळ्यांसाठी शहरातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.