आमदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अंबाजोगाईत राष्ट्रवादी आपल्या दारी, संपर्क – संवाद अभियानाचा शुभारंभ

अंबाजोगाईकरांचा अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद 

अंबाजोगाई : राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दि. 2 सप्टेंबरला शुक्रवारी राष्ट्रवादी आपल्या दारी संपर्क व संवाद अभियानाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे, दगडू भाई, बबन लोमटे, हाजी महेमुद, संकेत मोदी, विलास सोनवणे, दत्ता सरवदे, यांच्यासह शहरातील असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.     

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, देशाचे माजी कृषिमंत्री खा. शरदचंद्र पवार यांचे विचार गावकुसातील प्रत्येक घटकापर्यंत पोचविण्यासाठी अंबाजोगाई शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या वतीने ‘राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या दारी, संपर्क व संवाद अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात शहरातील सदरबाजार परिसरातील प्रभाग क्रमांक 1 मधून करण्यात आली. हे अभियान सदर बाजार, मोची गल्ली, गांधी नगर, मिलिंद नगर, काळम पाटील गल्ली, बाराभाई गल्ली, रविवार पेठ या भागात राबवित नागरिकांशी संवाद साधण्यात आला. 

धनंजय मुंडे यांचे थाटात स्वागत

आमदार धनंजय मुंडे यांचे अंबाजोगाई शहरात आगमन झाल्यानंतर क्रेनच्या साह्याने पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आपल्या प्रभागात झालेल्या विकास कामाबाबत माहिती सांगून काही उरलेली कामे देखील लवकरच होतील, अशी आशा नागरिक व्यक्त करत होते. नागरिकांच्या विविध समस्या धनंजय मुंडे हे मोठ्या आपुलकीने ऐकून घेत होते.

या अभियानात राजकिशोर मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यात प्रामुख्याने  शेख मोईन, मूनवर भाई, पंडित हुलगुंडे, डी. के. कांबळे, मोरेवाडीचे सरपंच औदुंबर मोरे, गोविंद पोतंगले, डॉ. राजेश इंगोले, संतोष शिनगारे, अशोक जेधे, सय्यद ताहेर, वाजेद खतीब, खलील जाफरी,  जावेद गवळी, सोमनाथ धोत्रे यांनी मोलाचे सहकार्य केले.