‘आई’ सेंटरचा ‘द आयडीयल इंडीयन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ संस्थेच्या जागतिक विक्रम नोंदीमध्ये समावेश

अंबाजोगाई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रध्वज सर्वात उंच जागेवर 15 ऑगस्ट 2022 रोजी फडकवण्याचा जागतिक बहुमान अंबाजोगाई येथील ‘आई’ सेंटर (इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर) ला मिळाला आहे. सदरिल जागतिक विक्रम केल्याच्या नोंदीचे प्रमाणपत्र ‘आई’ सेंटरचे संचालक सर नागेश जोंधळे यांना नुकतेच प्राप्त झाले असून त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

या संदर्भात ‘द आयडीयल इंडीयन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या संस्थेच्या वतीने नागेश जोंधळे यांना प्राप्त झालेल्या पत्रात असे म्हटले आहे की, सर नागेश जोंधळे, आम्हाला तुमच्या रेकॉर्डचे तपशील मिळाले आहेत आणि तुमचे रेकॉर्ड स्वीकारले गेले आहे. सदरिल मिळालेल्या माहितीनुसार आपण ‘इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर’ अर्थात ‘आई’ सेंटरने फडकवलेला सर्वात ज्यास्त लांबीचा भारतीय ध्वज आणि जास्तीत जास्त सहभागींसह फडकावणारी भारतातील पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे. 

आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रध्वज शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांसह आणि संस्थेच्या हितचिंतकांसह ऐतिहासिक निसर्गरम्य ठिकाण टीव्ही सेंटर, अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र, भारत येथे फडकवला. या उपक्रमाची नोंद भारतातील सर्वात मोठ्या शैक्षणिक टीम सदस्यांसह सर्वात ज्यास्त लांबीचा भारतीय ध्वज फडकवला, अशी ठरली आहे. हा उपक्रम सर नागेश जोंधळे ‘आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था’ चे अध्यक्ष, संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिल्या क्रमांकाचे ‘बेस्ट सेलिंग लेखक’ नागेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्याने करणे शक्य झाले आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताचा ऐतिहासिक 75 वा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि हा महोत्सव ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून ओळखला जातो. म्हणून ही घटना विशेष उल्लेखनीय आहे. 

सदरिल ‘द आयडिअल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या संस्थेच्या वतीने हे पत्र ‘आई’ सेंटरचे संचालक नागेश जोंधळे यांना नुकतेच प्राप्त झाले असून या सन्मानाबद्दल या उपक्रमात यशस्वी नेतृत्व करणारे विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांच्यासह विशेष सहभागी झालेले ‘स्वाराती’ चे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, कृषी महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, अंबाजोगाई दूरदर्शन केंद्रप्रमुख इंजि. सदाशिव चापुले, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, छाती विकार तज्ज्ञ डॉ. राहुल धाकडे, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, जगन सरवदे, दादासाहेब कसबे, रणजित डांगे, प्रा. डॉ. इंद्रजीत भगत, प्रा. डॉ. अनंत मरकाळे, प्रा.‌ डॉ. किरण चक्रे, कवी राजेश रेवले, अरूण शिंदे, राष्ट्रध्वज टेलर महादेव पुदाले या मान्यवरांसह ‘आई’ सेंटरचे सर्व पदाधिकारी, हितचिंतक, सर्व फॅमिली मेंबर्स यांचं नागेश जोंधळे यांनी विशेष आभार मानले आहेत.