‘महास्वच्छता’ अभियान : ‘रोटरी’ क्लब, ‘स्वाराती’ च्या विद्यार्थ्यांनी केली हत्तीखाना परिसराची स्वच्छता

अंबाजोगाई : ‘रोटरी’ क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आणि स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करण्यासाठी ‘महास्वच्छता’ अभियान राबवण्यात आले. यात हत्तीखाना परिसराची स्वच्छता करण्यात आली.

अंबाजोगाईतील ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे, त्याची स्वच्छता व्हावी, शहरातील नागरिकांना या स्थळाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, जेणे करून अंबाजोगाईच्या खऱ्या ऐतिहासिक संपत्तीचे जतन होईल, या उद्देशाने या स्वच्छता मोहीमेचे आयोजन हत्तीखाना या ऐतिहासिक स्थळी करण्यात आले होते. या ‘महास्वछता’ अभियानामध्ये ‘स्वाराती’ महाविद्यालयातील जवळपास 300 विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांचेही या अभियानासाठी सहयोग लाभले.

‘रोटरी’ क्लबचे अध्यक्ष रो. मोईन शेख, सचिव भिमाशंकर शिंदे, प्रोजेकट डायरेक्टर ॲड. अमित गिरवलकर, रो. अजित देशमुख, रो. राम सारडा, रो. प्रा. रमेश सोनवळकर, रो. संतोष मोहिते, रो. प्रवीण चौकडा, रो. सचिन बेंबडे, रो. गोरख मुंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य पी. आर. थारकर, प्रा. रमेश सोनटक्के, ‘एनएसएस’ चे प्रमुख प्रा. किरण चक्रे, डॉ. गायत्री गाडेकर, प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे यांच्यासह आदींनी या ‘महास्वच्छता’ ‌अभियानात सहभाग नोंदविला.