मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजच शेवटचा दिवस असून राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात एक मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात 75 हजार शासकिय रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
एमपीएससी तर्फे आकृतीबंधानुसार ही पदे भरण्यात येतील तसेच जिल्हा निवड समित्यांतर्फे भरण्यात येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पन्नास टक्के पदे देखील भरण्यात येतील, असे शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात सांगितले.
यासोबतच मराठा समाजातील तरुणांसाठी देखील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, मराठा समाजातील तरुणांना आर्थिक दुर्बल गटामध्ये आरक्षित पदांवर नियुक्ती मिळणार आहे. तसेच भरती प्रक्रीयेमध्ये अनियमीतता केलेल्या खाजगी कंपन्याचा या प्रक्रियेमध्ये समावेश होणार नसल्याचे शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.