महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आता 25 ऑगस्टला होणार सुनावणी

न‌वी दिल्ली : शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर गेल्या महिन्याभरापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी घेण्यात आली. 

सरन्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायाधीशांनी शिवसेनेची बाजू ऐकूण घेतली आहे. हे प्रकरण आता 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. 

पुढील सुनावणीही गुरुवारी म्हणजे 2 दिवसांनी होणार आहे, म्हणजे 25 ऑगस्टला घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. तसंच, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणुकापूर्वी प्रतिकात्मक मुद्यावर न्यायालयाने तोपर्यंत स्थगित दिली आहे.