टीम AM : सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर या दोघांची गणना बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये केली जाते. मात्र, सचिनला अभिनेता म्हणून जी लोकप्रियता आणि मान्यता मिळायला हवी होती ती मिळाली नाही. त्याने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली.
भले ते त्याच्या ‘नदिया के पार’ या चित्रपटाबद्दल का असेना. सचिन आणि त्याची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांचा 17 ऑगस्टला वाढदिवस आहे. दोघेही आपला वाढदिवस एकत्र साजरा करतात. दोघांमध्ये 10 वर्षांचा फरक आहे.
सुप्रिया आणि सचिनचं लग्न खूप वेगळं होतं. कारण जेव्हा सुप्रिया पिळगावकर यांनी सचिनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा ही बातमी सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारी होती. कारण दोघांमध्ये 10 वर्षांचा फरक होता. सचिन पिळगावकर 27 वर्षांचे होते तेव्हा सुप्रिया पिळगावकर फक्त 16 वर्षांच्या होत्या. दोघांमधील हा फरक कळल्यानंतर लोक म्हणू लागले की, दोघांचे लग्न टिकणार नाही, पण आज दोघांच्या लग्नाला 33 वर्षे झाली आहेत.
दोघांच्या मुलीचे नाव आहे श्रेया पिळगावकर
सचिन आणि सुप्रिया यांना श्रेया पिळगावकर नावाची मुलगी आहे. श्रेयाशिवाय दोघांनीही करिश्मा नावाची मुलगी दत्तक घेतली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत. सचिन पिळगावकर यांचा जन्म 17 ऑगस्ट 1957 रोजी मुंबईत एका मराठी कुटुंबात झाला तर त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकर यांचा जन्म 17 ऑगस्ट 1967 रोजी झाला.
‘हा माझा मार्ग एकला’ हा सचिनचा पहिला होता चित्रपट
सचिनच्या आयुष्यातील पहिला चित्रपट ‘हा माझा मार्ग एकला’ होता, ज्यामध्ये त्याने बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यावेळी त्यांचे वय अवघे 4 वर्षे होते. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधा कृष्णन यांनी बक्षीस दिले होते. सचिनने आपल्या करिअरमध्ये 65 हून अधिक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या असून त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या भूमिकाही केल्या. ‘शोले’ चित्रपटात अहमदच्या भूमिकेसाठी सचिनला फी म्हणून फ्रीज देण्यात आल्याचे बोलल्या जातं.