बीड : पाटोदा – मांजरसुबा रोडवरील बामदळे वस्तीजवळ स्विफ्ट कार – आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 14 ऑगस्टला सकाळी समोर आली आहे. केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे पुण्यावरून लग्नाला येत असताना हा अपघात झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे सकाळी सातच्या दरम्यान आयशर टेम्पो – स्विफ्ट कारचा भीषण अपघाता झाला. हा अपघात इतका भीषण होता की आयशर टेम्पोच्या खाली स्विफ्ट कार घुसल्याने कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. अपघातात स्विफ्ट कारचा चुराडा झाला असून यातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते, पोलीस हजर झाले होते. सर्वांनी मिळून मृतदेह काढण्यास मदत केली.