अंबाजोगाई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त येथील स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालयात संरक्षणशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानेदिनांक 12 ऑगस्टला ‘हर घर तिरंगा रॅली’ काढण्यात आली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आहे. ‘स्वाराती’ महाविद्यालयातही आज ‘हर घर तिरंगा रॅली’ काढण्यात आली. तसेच महाविद्यालयात सरंक्षणशास्त्र विभागाद्वारे भित्तीपत्रक, सेल्फी पॉईंटचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. थारकर, उपप्राचार्य डॉ. सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयक्युएसीचे समन्वयक डॉ. आर्या, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. जवळगावकर, पदव्युत्तर विभागाच्या प्रमुख प्रा. बरुरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. चक्रे, डॉ. सोनवणे प्रा. डॉ. गाडेकर, प्रा. सोनवळकर प्रा. पालमकर, प्रा. डोंगरे, प्रा. गोविंद कुलकर्णी, प्रा. अभिजीत देशपांडे डॉ. संपदा कुलकर्णी, प्रा. बुरांडे मॅडम, प्रा. शिंपले, प्रा. घोडके, प्रा. महेश चौरे तसेच संस्थेचे संचालक, प्रा. लोमटे, डॉ. शैलेश वैद्य, महाविद्यालयाचे विद्यार्थी, कर्मचारी आदी उपस्थित होते.