धनंजय मुंडेंची शब्दपूर्ती : बर्दापूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे शनिवारी होणार भूमिपूजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारून सुशोभीकरण करण्याच्या कामास सत्तेत असताना मंजूर केला होता निधी

धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार स्मारकाचे भूमिपूजन, पूज्य भिक्खू पय्यानंदजी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

अंबाजोगाई : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात दिलेला शब्द पूर्णत्वास जात असून, बर्दापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकस्थळी पुतळा उभारुन सुशोभीकरण करण्याच्या कामाचे शनिवारी (दि. 13) सकाळी 11. 30 वा. भूमिपूजन संपन्न होणार आहे. 

सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी बर्दापूर व परिसरातील भीम अनुयायांच्या मागणीनुसार या कामासाठी 1 कोटी 32 लाख 70 हजार रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. 

या स्मारक उभारणीच्या कामाचे शनिवार दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वा. धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असून, मराठवाडा भिक्खू संघाचे सचिव पूज्य भिक्खू पय्यानंदजी हेही या कार्यक्रमास विशेष उपस्थित राहणार आहेत. 

त्याचबरोबर आ. संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅड. राजेश्वर चव्हाण, बजरंग सोनवणे, माजी आ. पृथ्वीराज साठे, बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, वाल्मिक कराड, राजकिशोर मोदी, गोविंदराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनोद जगतकर, दत्ता पाटील, शिवाजी सिरसाट, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, बबन लोमटे, विजयकुमार गंडले, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी रवींद्र शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय मुंडे यांसह बर्दापूरचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व भीम अनुयायी उपस्थित राहणार आहेत.