पोलिस बांधवांना राखी बांधून मुलींनी साजरा केला ‘रक्षाबंधन’

अंबाजोगाई : खोलेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील पोलिस बांधवांना महाविद्यालयातील मुलींनी राखी बांधून ‘रक्षाबंधन’ चा सण साजरा केला.  

महाविद्यालयातील स्वयंसेविकांनी सर्व पोलीस बांधवांना व पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना राखी बांधून हा सण साजरा केला. यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित स्वयंसेविका व स्वयंसेवक यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध शस्त्र, त्याचे विविध प्रकार याविषयी माहिती सांगितली आणि त्यांचे हाताळण्याचे कौशल्य त्यांना शिकवले. तसेच पोलीस ठाण्यातील सर्व कामकाज पद्धती याविषयी पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व माहिती स्वयंसेवकांना दिली.

यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी, उपप्राचार्य प्रा. डॉ. बिभीषण फड, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. डी. एस. फुलारी, प्रा.डॉ. रोहिणी अंकूश, विभागातील सदस्य प्रा. डॉ. उमाकांत कुलकर्णी, प्रा. डॉ. विलास नरवडे, प्रा. वैभव गंगणे, प्रा. किशोर काळुसे, प्रा. सुवर्णा वाघुळे, प्रा. शिल्पा दळवी आणि इतर कर्मचारी व स्वयंसेवक, स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.