मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार ? : 18 मंत्री घेणार आहेत शपथ, स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना मिळणार संधी

मुंबई : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक महिना उलटला तरी अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरुन आता आरोप‌- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा शपथविधी साध्या पद्धतीने राजभवनावर होणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना संधी मिळणार आहे, त्याबाबत काही नावांवर फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 मंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.