टीम AM : सुरेश वाडकर हे भारतीय चित्रपटसृष्टीचे सुमधुर पार्श्वगायक आहेत. आज 7 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे. सुरेश वाडकर यांनी अनेक भोजपुरी, कोकणी आणि ओडिया गाण्यांना आवाज दिला आहे.
1955 मध्ये कोल्हापूर येथे जन्मलेल्या सुरेश यांना चित्रपटांमध्ये गाण्याव्यतिरिक्त लोकसंगीताची आवड आहे. त्याचवेळी बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षितच्या कुटुंबातून त्यांच्यासाठी एक नातं आलं, हे नातं बनण्याआधीच कसं बिघडलं ते बघा…
बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दिक्षित हसते, तेव्हा तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आपला जीव गमवायला तयार असतात. या मोहिनी मुलीचे नाते सुरेश वाडकर यांच्याशी पक्के होणार होते.
माधुरीच्या आई – वडिलांसह इतर कुटुंबातील सदस्यांना तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये प्रवेश करावा असे वाटत नव्हते, त्यामुळे त्यांना माधुरीचे लग्न करायचे होते.
सुरेश वाडकर हे महाराष्ट्रीयनं असल्यामुळे माधुरीच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता, मात्र, असं बोलल्या जातं की, सुरेश वाडकर यांनी तिला खूप सडपातळ म्हणत या नात्याला नकार दिला होता.
सुरेश वाडकर यांनी हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी अगदी लहान वयातच संगीताचे शिक्षण घेतले. सुरेश वाडकरांचा आवाज खूप गोड आणि सुमधुर आहे.
सुरेश वाडकर यांनी ‘लगी आज सावन की, ‘सीने में जलन’, ‘मेघा रे मेघा रे’, ‘मेरी किस्मत में तू नहीं शायद’, ‘मैं हूं प्रेम रोगी’, ‘तुमसे मिलकर’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’ अशा शेकडो गाण्यांना आपला आवाज दिला आहे. आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त आम्ही त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.