अंबाजोगाई : वीज कोसळून होणारे मृत्यू टाळण्यासाठी स्मार्ट फोनमध्ये ‘दामिनी’ ॲप इंस्टाल करून घेण्याचं आवाहन, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केलं आहे.
पुणे येथील भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था आणि भारतीय हवामान विभागानं हे ॲप विकसित केलं आहे.
वीज पडण्यापूर्वी वातावरण निर्मिती होत असते, अशा वेळी सुरक्षा बाबींचं पालन केलं तर जीवित तसंच वित्त हानीपासून बचाव करता येऊ शकतो, असं शर्मा यांनी म्हटलं आहे.