टीम AM : भगवान बुद्धांचा पवित्र संदेश ज्या नागलोकांनी संपूर्ण भारतभर पसरवला त्या नागलोकांचा हा सण. नागलोक भगवान बुद्धांचे उपासक होते. नागपंचमीचा संबंध ‘नाग’ या सरपटणाऱ्या सापासी नसून भारतात नाग हे टोटेम असणारे पाच पराक्रमी नागवंशीय राजे होवून गेलेत. जाणून घेऊआत आपण राजे आणि त्यांच्या राज्याविषयी.
◾नागराजा अनंत (शेष)
◾नागराजा वासुकी
◾नागराजा तक्षक
◾नागराजा कर्कोटक
◾नागराजा ऐरावत
ह्या पाचही नागवंशीय राजांचे स्वतंत्र राज्ये होती.
यात नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू – काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते.
दुसरा नागराजा वासुकी नागराजा. हा कैलास मानसरोवरपासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता.
तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच पुढे प्लेटो, ॲरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत.
चवथा नागराजा कर्कोटकाचे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते.
पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) भंडारा प्रांत आजही पिन्गालाई एरीया म्हणून ओळखला जातो.
ह्या पाचही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा ऐकमेकांच्या राज्याला लागून होत्या. पाच नागराजे मृत्यू पावल्यानंतर, त्यांच्या जन्म स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोक ‘नागपंचमी’ दिन दरवर्षी साजरा करीत असत. कालांतराने नागराजाचे रुपांतर जमिनीवर सरपटणाऱ्या सापात करुन टाकले आणि हा दिवस फक्त सरपटणाऱ्या सापांची पंचमी म्हणून ओळखला जावू लागला. वास्तविक नागवंशीय राजे लोकांची पंचमी लुप्त झाली.
आज नागाला दुध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलेला नाही. हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होते, ते जमिनीवर सरपटनारे सर्प नव्हेत. आज जरी नागपंचमी ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिध्द असली तरी त्याबाबतची ऐतिहासिक वास्तविकता वेगळीच आहे.