औरंगाबाद : नांदेड – तिरुपती आणि औरंगाबाद – तिरुपती दरम्यान विशेष गाडीच्या आठ फेऱ्या होणार आहेत. नांदेड – तिरुपती ही गाडी येत्या 30 जुलैला नांदेडहून तर परतीच्या प्रवासात 31 जुलैला तिरुपतीहून सुटेल. औरंगाबाद तिरुपती दरम्यान विशेष गाडी 7, 14 आणि 21 ऑगस्टला औरंगाबादहून, तर 8, 15 आणि 22 ऑगस्टला तिरुपतीहून सुटणार आहे.
नांदेड – पनवेल गाडी कुर्डूवाडीपर्यंतच धावणार
रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या दौंड – कुर्डूवाडी सेक्शनमधल्या भिगवण – वाशिंबे रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचं काम सुरू असल्यामुळे नांदेड – पनवेल ही गाडी येत्या 4 ते 8 ऑगस्ट या काळात नांदेडपासून कुर्डूवाडीपर्यंतच धावणार आहे. कुर्डूवाडी – पनवेल हा टप्पा सध्या रद्द करण्यात आला आहे. तर, पनवेल – नांदेड ही गाडी येत्या 5 ते 9 ऑगस्ट या काळात पनवेलऐवजी कुर्डूवाडीपासून नांदेडसाठी सुटणार आहे.