अंबाजोगाई : औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत दहावर्ष वयोगटात रणवीर राठोडला रौप्यपदक मिळाले. बारावर्ष वयोगटात रणवीर देशमुख याने कांस्यपदक पटकावले आहे. या दोघांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत बीड जिल्ह्यातील खेळाडू सोहम गिर्गिरवार, भागवत कदम, श्रेयश गायके, पृथ्वीराज भोसले, प्रथमेश डाके, सार्थक राठोड, आदित्य गिरी, आदर्श तोंडे, हर्षद गायकवाड, अनिरुध्र अर्सुळ, श्रीनिवास केंद्रे, निशिगंधा गायकवाड, मयुरा सोमवंशी, समृध्दी शेप यांनी सहभाग घेलता होता.
खेळाडूंचे अभिनंदन छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे संचालक मंडळ, स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदीरचे संचालक मंडळ आणि बीड जिल्हा तलवारबाजी संघटनेचे पदाधिकारी यांनी केले. खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा शिक्षक पिराजी कुसळे यांनी केले.