‘इनरव्हील’ क्लब अंबाजोगाईच्या अध्यक्षपदी मेघना मोहिते तर सचिवपदी अर्चना मुंदडा

रविवारी होणार पद्ग्रहन समारंभ

अंबाजोगाई : ‘इनरव्हील’ क्लब अंबाजोगाईच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या मेघना संतोष मोहिते यांची तर सचिवपदी अर्चना मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

‘इनरव्हील’ क्लब अंबाजोगाईच्या सन 2022 – 23 या नवीन वर्षाची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली. अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या मेघना संतोष मोहिते यांची तर सचिवपदी अर्चना मुंदडा, उपाध्यक्ष सोनाली कर्नावट, कोषाध्यक्षा सुरेखा शिरसाट तर पदाधिकारी म्हणुन संगीता नावंदर, शिवकन्या पवार, सुहासिनी मोदी, स्वरूपा कुलकर्णी, रेखा तळणीकर, जयश्री कराड, वैजयंती टाकळकर, रेखा शितोळे, वर्षा जळकोटे यांचा समावेश आहे.

या नवीन पदाधिकारी यांचा पद्ग्रहन समारंभ 31 जुलैला रविवार रोजी दुपारी दोन वाजता  नगरपरिषदेच्या विलासराव देशमुख सभागृहात होणार आहे. या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून लातुर येथील उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, अंबाजोगाई येथील शिक्षण विस्तार अधिकारी मुमताज पठाण उपस्थित राहणार आहेत. या पद्ग्रहन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन ‘इनरव्हील’ क्लबच्या अध्यक्षा अंजली चरखा यांनी केले आहे.