अभिनंदनीय : उद्योजक प्रदीप ठोंबरे यांना ‘रोटरी भूषण’ पुरस्कार प्रदान

अंबाजोगाई : रस्ते व इमारत बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या यश कन्स्ट्रक्शनचे संचालक युवा उद्योजक प्रदीप ठोंबरे यांना रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचा 2020 – 21 चा ‘रोटरी भूषण’ पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या पदग्रहण सोहळ्यात युवा उद्योजक प्रदीप ठोंबरे यांना ‘रोटरी भूषण’ पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी अनिता प्रदीप ठोंबरे, अदिती प्रदीप ठोंबरे, यश प्रदीप ठोंबरे व ठोंबरे कुटुंबाच्या उपस्थित हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ होते.

या कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून रो. स्वाती हेरकाळ तर सहाय्य प्रांतपाल रो. उमाकांत थोरात, रो. अध्यक्ष विवेक गंगणे, रो. सचिव रोहिणी पाठक, रोटरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रो. मोईन शेख, रो. सचिव भीमाशंकर शिंदे यांच्यासह कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे मेम्बर, शहरातील सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. प्रदीप ठोंबरे यांना ‘रोटरी भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.