पावसाचा हाहाकार : राज्यात गेल्या 15 दिवसात 102 जणांचा मृत्यू

आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती

मुंबई : राज्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली असून सर्वदूर चांगला पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यानं नागरिकांना मोठ्या नुकसानीलाही समोरं जावं लागलं आहे.

यामध्ये गेल्या पंधरा दिवसात सुमारे 102 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं ही माहिती दिली आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात 1 जुलैपासून आत्तापर्यंत पावसामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पंधरा दिवसात 102 जणांचा बळी गेला आहे. गेल्या चोवीस तासात दोघांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण बेपत्ता आहेत. यामध्ये 181 जनावरांचाही मृत्यू झाला आहे.