खोलेश्वर महाविद्यालयात पार पडली व्यवसाय समुपदेशन कार्यशाळा

अंबाजोगाई :  जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने दिनांक 15 जुलै 2022 रोजी खोलेश्वर महाविद्यालयातील व्यवसाय शिक्षण विभागाच्या वतीने व्यवसाय समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून अग्निपंख स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक सुहास माने तसेच त्यांचे सहकारी जाधव हे उपस्थित होते.

त्याचबरोबर खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक शैलेश कंगळे हे देखील मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.‌ डॉ. दिगंबर मुडेगावकर, व्यवसाय शिक्षण विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. रवींद्र कुंबेफळकर, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बिभिषण फड तसेच व्यवसाय शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक प्रा. योगेश कुलकर्णी  यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

या कार्यक्रमात सुहास माने तसेच शैलेश कंगळे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकसन संदर्भात उचित असे मार्गदर्शन केले. अनुक्रमे उद्योजकता विकास व स्वदेशी कौशल्य विकास यावर सविस्तर मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवींद्र कुंबेफळकर यांनी केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिता बर्दापुरकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. अजय डूबे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी व्यवसाय शिक्षण विभागातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.