मोठी बातमी : राज्यातील 8 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निवडणुकांनंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. 

पूर आणि आपात्कालीन परिस्थितीमुळे सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे सुमारे आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्य सरकरने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत आहे. तसेच पावसामुळे 89 व्यक्तींचे निधन झाले आहे. राज्यात अतिवृष्टी असल्याने 249 गावे बाधित झाले आहेत. पावसामुळे होणारे नुकसान चालू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.