राष्ट्रवादी काँग्रेसने दिले निवेदन
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यामधील अनेक गावांत सोयाबीनच्या कोवळ्या मोडांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही भागांत तर अक्षरशः अख्खे वावर गोगलगायींनी फस्त केले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
परिणामी पिकांच्या झालेल्या नुकसानाची 50 हजार रुपये भरपाई देण्यात यावी, असे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बीडच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी विधान परिषद सदस्य संजय दौंड, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, बबन लोमटे, ताराचंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.