माकेगाव सेवा सहकारी सोसायटीवर देशमुखांचे वर्चस्व

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

अंबाजोगाई : तालुक्यातील सहकार आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या माकेगाव सहकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. या सोसायटीवर ज्येष्ठ नेते अशोकराव देशमुख आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांचे वर्चस्व अबाधित राहीले आहे.

माकेगाव सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीपराव देशमुख आणि व्हाईस चेअरमनपदी जयदत्त देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते गुरूवार, दिनांक 14 जुलैला रोजी हृदय सत्कार करण्यात आला.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. गाव पातळीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध, शांततेत व सुरळीत होण्यासाठी माकेगाव ग्रामस्थांमध्ये एकमत करण्यासाठी ज्येष्ठ नेते अशोकराव देशमुख आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी गावातील सर्वांना सोबत घेवून विधायक प्रयत्न केले. त्याला यश मिळाले आणि या सोसायटीवर ज्येष्ठ नेते अशोकराव देशमुख आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांचे वर्चस्व कायम राहीले आहे. 

माकेगाव सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शेतकरी, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी सरपंच संजयराव देशमुख, ज्ञानोबाराव देशमुख, मारूती देशमुख, सोनू विरगट, राहुल देशमुख, अनिल देशमुख, प्रशांत कांबळे, बालासाहेब जाधव, कमलाकर देशमुख, विलास देशमुख, सतिश मामा, समीर देशमुख, सार्थक देशमुख, हनुमंत मुळे, नवनाथ विरगट, बालासाहेब देशमुख, कल्याण देशमुख, सुरेश देशमुख, हनुमंत कांबळे, मालोजी गलांडे, अतुल देशमुख, राजपाल देशमुख, रजनीकांत विरगट आदींसह इतरांची उपस्थिती होती. 

निवडणुकीमुळे संस्थेवर पडतो आर्थिक भार

निवडणुकी वरील खर्च अनाठायी ठरतो. सध्या सर्वच सहकारी संस्थांना कोरोनामुळे आर्थिक झळ बसलेली आहे. त्यातून आर्थिकदृष्ट्या प्रगतिपथावर येण्यासाठी अनावश्यक खर्च टाळता आला पाहिजे. परंतू, आपल्या लोकशाही प्रधान देशात प्रत्येकालाच निवडणूक लढविण्याचा अधिकार भारतीय राज्य घटनेने प्रदान केलेला आहे. याचा आदर करीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात माकेगाव ग्रामस्थ व सभासदांनी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. आम्ही सर्वांना सोबत घेऊन माकेगाव आणि पंचक्रोशीतील सर्वच गावांच्या  सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध आहोत. सेवा सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सर्व विजयी संचालकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा. – राजेसाहेब देशमुख : अध्यक्ष, बीड जिल्हा काँग्रेस कमिटी.