मोठी बातमी : नगरपरिषद – नगरपंचायत निवडणूकांना स्थगिती

राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी

मुंबई : राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगर पंचायतच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाने 08 जुलै रोजी घोषणा केली होती. मात्र, आज दि.14 जुलैला या निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेवर येत्या 19 जुलै रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे घोषित करण्यात आलेला नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून यथावकाश याबाबत निवडणूक कार्यक्रम घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.