मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
आज मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील्या काही भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगानं वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल, तर उद्या आणि परवा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
दरम्यान, उस्मानाबाद, नांदेडमध्ये काल रात्रभर भिज पाऊस झाला तर अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांश गावातही रात्रभर पाऊस झाला आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.