क्लबच्या अध्यक्षा अंजली चरखा यांना बेस्ट क्लब प्रेसिडेंटचे द्वितीय पारितोषिक
अंबाजोगाई : ‘इनरव्हील’ क्लबची विभागीय वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 2 व 3 जुलै रोजी पुणे येथे पार पडली. या सभेत अंबाजोगाई ‘इनरव्हील’ क्लबचा त्यांनी वर्षभरात केलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
अंबाजोगाई क्लबला विभागीय पातळीवरील 6 पुरस्कार देण्यात आले. क्लबच्या अध्यक्षा अंजली चरखा यांना बेस्ट क्लब प्रेसिडेंटचे द्वितीय पारितोषिक मिळाले. तसेच क्लबच्या सचिव मेघना मोहिते यांना बेस्ट सेक्रेटरीचे तृतीय पारितोषक व सोनाली कर्नावट याना बेस्ट आयएसओचे तृतीय पारितोषिक मिळाले. यावेळी बोलताना डी.सी. संतोष सिंग यांनी क्लबचे विशेष कौतुक करताना म्हटले की, ग्रामीण भागातील क्लब असूनही यावर्षी अंबाजोगाई क्लबने दिलेल्या थीमवर आधारित सर्व प्रोजेक्ट पूर्ण केले. तसेच त्यांच्या सदस्य संख्येत मोठी वाढ केली.
या गोष्टींची विशेष दखल घेऊन अंबाजोगाई क्लबचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अंजली चरखा यांची आपल्या अध्यक्षीय काळात केलेल्या कार्याची पावती म्हणून त्यांची पुढील वर्षासाठी विभागीय पातळीवर झोनल सब को – ओर्डीनेटर या पदी नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाला अंजली चरखा, अर्चना मुंदडा, जयश्री कऱ्हाड, जयश्री लव्हारे यांच्यासह विभागातील 500 हुन अधिक पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. क्लबच्या यशाचे समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.