अंबाजोगाई ‘रोटरी’ च्या अध्यक्षपदी मोईन शेख तर सचिवपदी भिमाशंकर शिंदे

अंबाजोगाई : रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या अध्यक्षपदी शेख मोईन शेख रहीम यांची तर सचिवपदी भिमाशंकर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या सन 2022 – 23 या नवीन वर्षाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी शेख मोईन, उपाध्यक्षपदी कल्याण काळे, सचिव – भिमाशंकर शिंदे, क्लब प्रशिक्षक – प्रवीण चोकडा, कोषाध्यक्ष शेख शकील तर कार्यकारिणी सदस्य म्हणून स्वप्नील परदेशी, डॉ. निशिकांत पाचेगावकर, धनराज सोळंकी, प्रा. संतोष मोहिते, बाळासाहेब कदम, गोपाळ पारीख, अमृत महाजन, स्वरूपा कुलकर्णी, डॉ. नवनाथ घुगे, सचिन बेंबडे, अंगद कराड, राम सारडा, डॉ. सुरेश अरसुडे, गणेश राऊत, डॉ. अनिल केंद्रे, प्रा. रमेश सोनवलकर, रुपेश रामावत, विवेक गंगणे, प्रदीप झरकर, गोरख मुंडे, डॉ. बालासाहेब लोमटे, आनंत लोमटे, अजित देशमुख, जगदीश जाजू यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकारी यांचा पद्ग्रहन सोहळा लवकरच होणार आहे.

रोटरी क्लबच्या माध्यमातून अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील. समाजातील उपेक्षित, वंचित यांच्या मदतीसाठी रोटरी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोईन शेख यांनी सांगितले.