अंबाजोगाई : येथील गोदावरी कुंकुलोळ योगेश्वरी कन्या शाळेमध्ये दि. 29 जून 2022 रोजी विधी साक्षरता शिबीर वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.
या साक्षरता शिबीरासाठी अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीश कुणाल जाधव उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा न्यायाधीश संजश्री घरत यांनी महिलांची होणारी अनैतिक तस्करी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ॲड. कल्याणी विर्धे यांनी मोफत शिक्षणाचा अधिकार व सक्तीचे शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश कुणाल जाधव यांनी दोन्हीही विषयावर विद्यार्थीनींशी समरस होवून मुलींनी घ्यावयाची काळजी यावर सखोल मार्गदर्शन करून अध्यक्षीय समारोप केला. सदरिल सर्व माहिती ही विद्यार्थीनींच्या हितासाठी उपयुक्त होती.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. शदर लोमटे, जिल्हा सरकारी वकील ॲड. अशोक कुलकर्णी, ॲड. अनंत तिडके, ॲड. शिवाजी कांबळे व संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. शिवाजीराव कराड, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती परोपकारी व उपमुख्याध्यापिका श्रीमती लोखंडे यांच्यासह शिक्षिका, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.