॥अभिष्टचिंतन॥ : माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब …..!!

शुद्ध बिजापोटी | 

फळे रसाळ गोमटी ॥

मुखी अम्रताची वाणी | 

देह देवाचे कारणी ॥

सर्वांग निर्मळ I

चित्त जैसे गंगाजळ ॥

तुका म्हणे जाती |

ताप दर्शने विश्रांती ॥

श्री. दत्तात्रय पवार गुरुजी आणि सौ. पार्वती आईच्या पोटी जन्मलेल्या चार रत्नापैकी एक, सर्वांचे लाडके रत्न म्हणजे आमदार अभिमन्यूजी पवार. ज्या घराच्या अंगणामध्ये तुळशी वृदांवण, गळ्यात तुळशीमाळ आणि पंढरीचीवारी त्या घराईतके संस्कार संपन्न आणि सधन असे दुसरे घर असूच शकत नाही. असा संस्कार संपन्न शिक्षकाच्या घरामध्ये एक जुलै 1971 रोजी उंबडगा ता. औसा या आजोळी शेतकरी मामाच्या गावी जन्म झाला. बालपणीचे सुरुवातीचे दिवस आपल्या आजोळी आणि वडील शिक्षक म्हणून ज्या गावामध्ये ( तुंगी ता. औसा ) काम करत होते त्या लहाणशा खेडेगावात गेले.

शिक्षण आणि अध्यात्माचा व्यसंगी असलेले शिक्षक वडील शिक्षणासाठी लातूरला स्थाईक झाले. चारी भावंडे लातूरच्या केशवराज शाळेमध्ये शिकत असताना पवार गुरुजी मात्र तुंगी या औसा तालूक्यातील तुंगी या छोट्याशा गावामध्ये ज्ञानदानाचे काम करत होते. गावातील गोरगरीबांच्या पोरांना शेळ्या, गुरे सांभाळणाऱ्या पोरांना शाळेमध्ये दाखल करून शिकविण्यात व्यस्त, सुट्टीच्या दिवसी तेवढे घरी, बाकी सर्व दिवस तुंगी मुक्कामी.

दिवसामागून दिवस गेले आणि पाहाता पाहता चारी भावंडाचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. थोरले बंधू भिमराव (आण्णा) पवार पुण्याच्या शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेऊण उच्च पदस्त अधिकारी झाले, दोन्ही बहीणी लग्न होऊण चांगल्या घरी गेल्या, तेव्हा अभिमन्यू पवार आपले दयानंद महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच शिक्षण पूर्ण करुण पुण्यामध्ये व्यवस्थापण शाखेमध्ये पदवीत्तर शिक्षण घेत होते. व्यस्थापण शाखेतील उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ नौकरी केली पण त्यात ते रमले नाहीत. व्यवस्थापण शाखेतील उच्च शिक्षण त्यांना व्यवसाय करण्यासाठी खुणावत असल्याने काही काळ स्वतःचा व्यवसायही केला. परंतू, त्यामध्येही ते फारशे रमले नाहीत.

मुखी अम्रताची वाणी |

देह देवाचे कारणी ॥

हे बाळकडू त्यांना स्वस्त बसू देत नव्हते. अस्वस्त मन आणि आत्मीक समाधानाची भूक त्यांना समाजसेवा, समाजकारण, अडीअडचणीच्या काळात लोकांना मदत, त्यातून राजकारणाकडे स्वतःला झोकुण दिले आणि त्यातून आनंद मिळत गेला. त्याच कामाच्या आनंद आणि समाधानातून लातूरच्या राजकीय क्षितीजावर अभिमन्यू पवार नानाच्या ताऱ्याचा जन्म झाला.

पंढरीची वारी, वारकरी, माळकरी घरामधून मिळालेली संस्काराची शिदोरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीमध्ये मिळालेली राष्ट्रभक्ती, समाजसेवा, नितीमत्ता आणि अध्यात्माच्या कुंडामधून ताऊण, खुलाखून निघालेले जितके शांत संयमी तीतकेच कणखर , कल्पक आणि आभ्यासू नेत्रत्व. या नेत्रृत्वाला भुतपूर्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक तसेच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम प्रकाश माथूर यांचे सहायक म्हणून काम करण्याची एक संधी मिळाली आणि ही संधी लोकहीतासाठी, गोरगरीबांच्या कल्याणासाठी, जो कोणी गरजवंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येईल त्याला आधार आणि मदत करण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून आजचे औशाचे आमदार मा. अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून होऊ लागले आणि मग अल्पावधीमध्ये हे नाव महाराष्ट्रभर सुपरीचीत झाले‌.

संपूर्ण महाराष्ट्रांमधून लोकांची कामे नूसत्या फोनवर होऊ लागली. काम वाढत गेली, मुळातच लोकांच्या कामी येण्याचा गुण आणि समाजसेवेचा ध्यास असलेल्या आभिमन्यू पवार साहेबांना त्यातून आनंद आणि आत्मीक समाधान मिळत गेले. लोकांची कामे होत आहेत म्हणून लोकांची गर्दी वाढत गेली. अगोदरच असलेल्या लोकसंग्रहामध्ये, जनसंपर्कामध्ये वाढ होत गेली आणि साहेबांची एक नवीन ओळख निर्माण झाली ती म्हणजे गर्दीतला मानूस.

स्वतःकडे कोणतेही आमदार, मंत्री पद नसताना वरिष्ठांचा विश्वास आणि स्वतःचा प्रामाणिकपणा एवढ्याच ताकतीकर लातूरसाठी रेल्वे बोगी प्रकल्प, अटलजी महाआरोग्य शिबीर, वैद्यकीय महाविद्यालयासाठी कृषि विद्यापीठाची जमीन उपलब्ध करुण दिली. एवढेच नव्हे तर लातूर बार असोसिएशनच्या जागेचा प्रश्न, मुस्लीम बांधवांसाठी शादी खान्याचा प्रलंबीत प्रश्न, लिंगायत समाजाचा स्मशानभुमीचा प्रश्न मार्गी लावला. लातूर जिल्ह्यामध्ये केलेली जलयुक्त शिवार कामे आणि मग काय सुजान लातूरकर अभिमन्यू पवार साहेबावर प्रेम करु लागले. 

आदरणीय कै. विलासरावजी देशमुख साहेबांची उणिव लातूरकरांना नेहमी भासणार तर आहेच, परंतू लोक पवार साहेबांची तूलना त्यांच्याशी करू लागले. दोघांच्यामध्ये असलेले साम्य लातूरमध्ये चर्चेला विषय होऊ लागला. भावी आमदार म्हणून लोक पवार साहेबांना संबोधू लागले, एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील कार्यकर्ते आपला मतदार संघ निवडा म्हणून आग्रह करु लागले.

औसा मतदार संघामध्ये काम करण्यासाठी आव्हानात्मक संधी आहेत हे ओळखूण पवार साहेबांनी शेवटी औसा मतदार संघामधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. निवडणूक म्हटले की, आव्हाणे आणि परीक्षा ही आलीच. निवडणूकीच्या चक्रविव्हामध्ये अडकऊण महायुद्ध छेडण्याचा प्रयत्नही झाला. परंतू, निवडणूकीपूर्वी केलेली कामे, त्यातून जनमानसात निर्माण झालेली प्रतिमा, पक्षातील थोरामोठयांचे आशीर्वाद, स्वतःचा असलेला जनसंपर्क, दांडगा मित्र परिवार आणि मतदार संघातील जनतेचे आशीर्वाद याच्या जोरावर विक्रमी मताधिक्याने अभिमन्यू पवार साहेबांचा विजय झाला आणि आपल्या मातीशी नाळ आणि जमिनीवर पाय असणारा एक सच्चा जनसेवक मतदार संघाला मिळाला.

निवडणूकीपुर्वी आणि निवडणूकींमध्ये मतदारांना दिलेला एक अन एक शब्द पूर्ण करण्यासाठी आमदार साहेब आज प्रयत्नाची परागकास्टा करत आहेत. औसा शहराचा पाणीपुरवठा, औसा, लामजना आणि कासारशिरशी येथील बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. कासार शिरशी ते शिरशी वाडी रस्ता मागील सात दशकापासून प्रलंबित होता. तो आता मार्गी लागतो आहे.

कोरोनासारख्या महामारीच्या काळात शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन अविरतपणे लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम अहोरात्र केले. आज संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूमुळे जे नकारात्मक वातावरण तयार झाले असतानाही महाराष्ट्रामध्ये एका विषयाची चर्चा सुरु आहे, देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून आजपर्यंत शेतकर्‍यांच्या बांधावरूण जाणाऱ्या शेतरसत्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. परंतू, अभिमन्यु पवार साहेबांनी नेमकी शेतकऱ्यांची शेत रस्त्याची शेतावर जाण्याची अडचण लक्षात घेऊण संपूर्ण मतदार संघामध्ये मागेल त्याला शेतस्ता देण्याचे धोरण अवलंबून शेतस्त्याचा प्रश्न जवळजवळ मार्गी लावलेला आहे.

आज जवळजवळ 1200 कि.मी.लांबीचे शेतरस्ते पूर्ण केले आहेत तर शेतरसत्याच्या दोन्ही बाजूने फळबाग लागवड करुन केशर आंबा हब निर्माण करत असतांना 1200 हेक्टर क्षेत्रावर झाडे लाऊण वनराई विकसीत करण्याचे काम त्यांनी केले आहे. ही सर्व कामे करत असतांना शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी दोन वर्षात 1000 गोठे बांधण्याचे काम आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाले आहेत. भविष्यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून ग्रामविकासाचा एक आदर्श नमुना म्हणून औसा मतदार संघ पुढे येईल, यात काही शंका नाही. अशा या जननायकाचा, जनसेवकाचा एक जूलै हा जन्मदिवस,  बा. विठ्ठलाकडे एकच प्रार्थना !

जीवेत शरद : शतं | 

पश्चेत शरद : शतं ॥

शरद शतं |

आभिष्ट चिंतनम ॥

जन्म दिवस्य शुभाशय ॥

आपला हितचिंतक 

प्रा. डॉ. डी. बी. तांदुळजेकर, लातूर , 9403814837.