अंबाजोगाई : स्त्री भ्रूणहत्या व यातुन उद्भवणाऱ्या सामाजिक समस्यांवर प्रहार करणारा मराठी चित्रपट ‘वाय’ चा प्रीमियर शो 27 जूनला दुपारी 3 वाजता शहरातील मोहन सिनेमार्क येथे आयोजित करण्यात आला आहे.
या चित्रपटाच्या प्रीमियर शो साठी प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी यांच्यासह चित्रपटातील कलाकार उपस्थित राहणार आहेत. या चित्रपटात मराठवाड्यातील अनेक उदयोन्मुख कलाकारांचा समावेश आहे.
अंबाजोगाई येथील प्रदिप भोसले, अनिल कांबळे, संजय मोरे यांच्यासह वैजयंती टाकळकर यांनीही या चित्रपटात कलाकार म्हणून भूमिका साकारली आहे.
मराठवाड्याच्या भूमीत चित्रीकरण झालेल्या या चित्रपटास महानगरांमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. अंबाजोगाई शहरवासीयांना या प्रीमियर शोमुळे चित्रपटातील प्रसिद्ध कलावंतांसोबत चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.