‘वाय’ थरारपट 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अजित सूर्यकांत वाडीकर लिखित व दिग्दर्शित ‘वाय’ हा सिनेमा येत्या 24 जूनला प्रदर्शित होईल. पहिल्या पोस्टरपासूनच खरंतर या चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

सुरुवातीला फक्त मुक्ता बर्वेचाच चेहरा समोर आल्यानंतर पडद्याआड असलेले चित्रपटातील इतर कलाकारही आता समोर आले आहेत. मुक्ता बर्वे व्यतिरिक्त प्राजक्ता माळी, रसिका चव्हाण प्रमुख भूमिकेत असल्याचे दिसून आले होते.

दुसऱ्या टिझरमधून चित्रपटातील अभिनेतेही समोर आले आहेत. यात नंदू माधव, संदीप पाठक, ओमकार गोवर्धन, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले, रोहित कोकाटे, संदीप दंडवते हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.