विरोधकांना मोदींचा सामना करणं अशक्य, 2024 ला ‘एनडीए’ चीचं सत्ता‌ येणार – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

ओबीसीं आरक्षण : सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात राज्य सरकारला अपयश 

अंबाजोगाईत पत्रकार बांधवांशी साधला संवाद

अंबाजोगाई : विरोधकांनी कितीही खटाटोप केला तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करणं अशक्य आहे, लोकसभेच्या 2024 च्या निवडणूकीत ‌’एनडीए’ चीचं सत्ता‌ येणारं, अशी ‌‌‌अपेक्षा ‌‌‌‌‌‌केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. 

अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आज 8 जूनला ना. आठवले यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला. यावेळी रिपाइंचे पप्पु कागदे, सिध्दार्थ भालेराव यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

पत्रकार बांधवांशी संवाद साधताना ना. आठवले म्हणाले की, ‘एनडीए’ ला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. देशात नॅशनल हायवेची कामं नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली जोरात चालू असून देशवासियांना चांगली आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध झाली आहेत. काँग्रेसच्या काळात दोनपदरी रस्ते होते तर ‘एनडीए’ ने चारपदरी रस्ते केले आहेत. मुद्रा योजनेच्या माध्यमांतून देशातील 35 कोटी जनतेला उद्योग धंद्यासाठी करोडो रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजना असो की महिलांसाठी उज्वला योजना असो, याची प्रभावीपणे अंमलबजावणी देशात करण्यात आली असून ‌‌ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी सरकारने अधिकचा निधी खर्च केला आहे, असेही ना. आठवले म्हणाले.

पुढे बोलताना ना. आठवले म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पात माझ्या मंत्रालयाला 1 लाख 42 हजार 391 कोटी रुपये मिळाले असून यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर पैसे खर्च केले जात आहेत, अजूनही माझं मंत्रालय काही नव्या‌ योजना आखणार असून त्याही योजनांना निधीची कमतरता भासनार नाही, असेही आठवले यांनी सांगितले.

ओबीसीं आरक्षण : सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात राज्य सरकारला अपयश 

पत्रकारांनी ओबीसीं आरक्षणावर विचारले असता आठवले म्हणाले की, माझ्या मंत्रालयातंर्गतच हा विषय येतो. केंद्राची ओबीसीं आरक्षण देण्याची भूमिका आहे, पण सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केले आहे. सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आरक्षण मिळू शकते, राज्य सरकारने योग्य बाजू मांडली पाहिजे, असे आठवले यांनी सांगितले. राज्यसभा निवडणूक, विधानपरिषदेच्या निवडणूकीवरही आठवले यांनी सडेतोड भाष्य केले. त्यासोबतच प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांची स्तूती करत अनेक आठवणींना उजाळा दिला. पत्रकार परिषदेला पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.