एकही गरजवंत वंचीत राहणार नाही- आदित्य पाटील
केज : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकामधील गरीब नागरिकांना घर बांधून देण्यासाठी सामजिक न्याय विभागातर्फे रमाई आवास घरकुल योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत केज शहरातील गरीब नागरिकांना घरकुल मिळावे यासाठी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन व नगर पंचायतच्या वतीने शासनास वेळोवेळी माहिती देऊन केज येथे रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत १२७ घरकुल मंजुर करुन आणले.
या रमाई घरकुल योजने अंतर्गत दुस-या टप्प्यातील मंजुर झालेले पात्र लाभार्थ्यांना नगराध्यक्ष आदित्य दादा पाटील यांनी मंजुरीपत्र वाटप केले. यावेळी त्यांनी सांगितले की, घरकुल पात्र लाभार्थ्यांना खात्यात ऑनलाईन पध्दतीने अनुदानाची प्रत्येकी एक लाख पंचेवीस हजार रुपये ऑनलाईन त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. तसेच यापुर्वी नगर पंचायत मार्फत ९३ घरकुल देण्यात आलेले आहेत. या दुस-या टप्प्यात १२७ घरकुल मंजुर झालेले असुन घरकुलांमुळे कुटुंबांना त्यांचे स्वतःचे पक्क्या चार भिंतीचे हक्काचे घर होणार आहे. तसेच केज शहरातील एकही कुटूंब घरकुलापासुन वंचित राहणार नाही यासाठी आम्ही कटीबध्द आहोत असे सांगितले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष दलीलमियॉं इनामदार, माजी नगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, माजी नगराध्यक्ष कबीरोद्दिन इनामदार, मुख्याधिकारी सचिन देशपांडे, केज तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे, नगरसेवक महादेव लांडगे, नगरसेवक शिवाजी हजारे, प्राचार्य डोईफोडे सर, समीर देशपांडे, कपील मस्के, प्रेमजित हजारे, शेखर सिरसट, रमेश कदम, ताहेर खुरेशी, आकाश गायकवाड, नगर पंचायतचे कर्मचारी वर्ग व केज शहरातील सन्मननीय नागरिक उपस्थित होते.