हिना चित्रपटातील ‘देर ना हो जाए’ या गाण्याचे गायक व कव्वालीचे बादशहा सईद साबरी यांचा आज स्मृतिदिन. सईद साबरी आणि त्यांचे बंधू हे ‘साबरी ब्रदर्स’ या नावाने लोकप्रिय होते. त्या दोघांनी कव्वालीचे अनेक शो केले होते. सईद साबरी यांना कव्वालीचे बादशहाच म्हटले जात असे. त्यांनी एकाहून एक सरस गाणी गायली आहेत.
सईद यांनी आपला मुलगा फरीद व लता मंगेशकर यांच्या सोबत ‘हिना’ चित्रपटातील कव्वाली ‘देर न हो जाए कहीं देर न हो जाए’ गायली होती. तसेच साबरी ब्रदर्सनी ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातील ‘इक मुलाकात जरूरी है सनम’ ही कव्वाली गायली होती.
‘सिर्फ तुम’, ‘देर ना हो जाए’, ‘इक मुलाकात जरूरी है सनम’ ही त्यांची गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. त्यांच्या मुलाचं फरीद साबरी यांचे 21 एप्रिल रोजी निधन झाले होते. सईद साबरी यांचे 7 जून 2021 रोजी निधन झाले.
शब्दांकन : संजीव वेलणकर