घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या घाटनांदूर सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत तेराच्या तेरा संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष व विद्यमान चेअरमन गोविंदराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत. निवडणूकीत सोमेश्वर शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने पुन्हा निर्विवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील व परळी विधानसभा मतदार संघातील घाटनांदूर या सर्वात मोठ्या तेरा संचालक असलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वच राजकीय नेत्याचे लक्ष लागले होते. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. तेरा संचालक असलेल्या व 1036 मतदान असलेल्या सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक दिनांक 6 जूनला सोमवारी अत्यंत शांतेत पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंद देशमुख, बाळासाहेब देशमुख, अजित देशमुख, ज्ञानोबा जाधव यांनी आघाडी करून श्री सोमेश्वर शेतकरी विकास आघाडी पॅनल केला तर भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य दता जाधव, माजी सरपंच वैजनाथ गारठे व लक्मिकांत देशमुख यांनी श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल उभा करून चुरशीची लढत दिली.
निवडणूकीच्या निकालात खुल्या प्रवर्गातून अतुल अनंतराव देशमुख, गोविंद बालासाहेब देशमुख, शिवलिंग चंबसअपा शेटे, भागवत बाबुराव नागरगोजे, अतुल दतात्रय जाधव, रामराव सीताराम शिरसाट, रामराव पाटलोबा बडे, वामन तुकाराम जाधव, महिला प्रवर्गातून उषा उत्तमराव जाधव, आशा शंकर चव्हाण, इतर मागास प्रवर्गातून श्रीकिशन दिनकर अरसुडे, भटक्या वि. प्रवर्गातून रामदास राजाराम वैद्य, अनुसूचित जमाती प्रवर्गातून बळीराम तात्याराव धोंगडे हे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. ए. मोरे यांनी काम पहिले.