अंबाजोगाई : अंबाजोगाई – केज रोडवर होळ जवळ इनोव्हा – अॅॅपे अॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅटोच्या झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर अजूनही 5 जणांवर अधिक उपचार करण्यात येत आहेत, त्यांचीही प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती समोर येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अॅॅपे अॅॅटोचा चुराडा झाला होता. हा अपघात दिनांक 2 जूनला 5:30 च्या सुमारास घडला होता.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई – केज रोडवर होळ जवळ भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा गाडीने (एमएच 16 सीएन 700) अॅॅपे अॅॅॅॅॅॅॅॅटो रिक्षाला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, अॅॅपे अॅॅटोचा जाग्यावरच चुराडा झाला. या अपघातात रिक्षाचा चालक बालाजी मुंडे (रा. पिसेगाव, ता. केज) याच्यासह 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतात सहा महिने आणि एक वर्षे वय असलेल्या दोन बालकांचा समावेश आहे. तर गंभीर जखमी असलेल्या महिला आणि पुरुषांवर अंबाजोगाईच्या ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमीपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटना वाढत असून वाहनं चालवताना चालकांनी गाडीचा वेग नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे.