अंबाजोगाईत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव उत्साहात साजरा

वृक्षारोपण, प्रबोधनपर व्याख्यान, भव्य मिरवणुकीचे आयोजन

अंबाजोगाई : शहरात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात शहर व तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शहरात 297 वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. तसेच चौकाचे सुशोभिकरण करून ‘होळकर घराण्याची राजमुद्रा’ महाराष्ट्रात प्रथमच अंबाजोगाई येथे बसस्थानकासमोरील चौकात स्थापना करण्यात आली. तसेच डॉ. विद्याताई कुंभार यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन देखिल यावेळी करण्यात आले होते. 

यावेळी राजनंदिनी पाटेकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांची वेषभूषा साकारली. हजारोंच्या उपस्थितीत अंबाजोगाई शहरातून ढोल – ताशांच्या गजरात, फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करीत संपूर्ण शहराच्या मुख्य चौक व प्रमुख रस्त्यांवरून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

या सर्व कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल लोमटे, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, तानाजी देशमुख, बाला पाथरकर, गणेश देशमुख, भिमसेन लोमटे, महेश कदम, अ‍ॅड. जयंत भारजकर, श्रीरंग चौधरी यांच्यासह पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समिती, धनगर गल्ली येथील अध्यक्ष गोटूदादा थाटकर, उपाध्यक्ष ओमआबा काळे, अशोक हेडे, कमलाकर हेडे, राजकुमार गायके, अशोक गंगणे, नवनाथ चौरे, राजेभाऊ उकरे, मंगेश थाटकर, कृष्णा आगाशे, साहिल शेवाळे, दत्ता गवळी, आदींसह पदाधिकारी यांनी सहभाग घेतला. जन्मोत्सव सोहळ्याच्या यशस्वितेसाठी धनगर गल्ली, शहर व परिसरातील उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.